Sign In

Blog

Latest News

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या मराठी शुभेच्छा

Rate this post

[2024] प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश | Republic day wishes in Marathi

26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने हा दिवस खूप मोठा दिवस आहे आणि हा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी सुट्टी देखील जाहीर केली जाते हा राष्ट्रीय सण असल्यामुळे सर्वांच्या साठी हा महत्त्वाचा दिवस असतो परंतु सर्वांनाच प्रश्न पडला असेल विशेषतः लहान मुलांना असा प्रश्न पडतो की प्रजासत्ताक म्हणजे काय?

तर प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजेच्या हाती सत्ता असणे अर्थात ज्या ठिकाणी देशाचा प्रमुख हा वारसा हक्काने न निवडला जाता लोकांमार्फत निवडला जातो आणि तेथील सर्व शासकीय कार्यालय व पदे ही देशाच्या सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव खुले असतात आणि हे सर्व अधिकार जनतेला ज्या दिवसापासून मिळाले त्या दिवसाला दरवर्षी प्रजासत्ताक दिन हा दिवस म्हणून साजरा केला जातो जसे आपल्या भारतात 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो कारण या दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला.

आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचा कारण म्हणजे किंवा उद्देश म्हणजे आपणास स्वतंत्रपणे कोणताही निर्णय घेऊ शकतो किंवा कोणत्याही प्रकारच्या धडकशाही व गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठवू शकतो तर हे केवळ आपल्या देशातील राज्यघटना व लोकशाही प्रवृत्तीमुळेच शक्य आहे यामुळे आपण आपला देशाने स्वतंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाचे व घटनेचे खूप मोठे योगदान आहे हे कदापि विसरून चालणार नाही त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व संविधानाची निर्मितीसाठी ज्यांनी योगदान दिले आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि या दिवशी आपण ध्वजारोहण करून भाषण आणि विविध प्रकारच्या नृत्यांचा कार्यक्रम आयोजित करतो.

चला तर याच 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण काही शायरी मेसेजेस आणि कविता बघणार आहोत ज्या तुम्हाला भाषण करण्यात किंवा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध लिहिण्यास मदत करतील.

 • स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष…
  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
 • मुक्त व्हावे लहरे सारखे जी
  आकाशी त्रिवरणी फडफडते आहे…
  स्वातंत्र्य असावे भारतासारखे
  जे आजन्म शौर्याने दवडते आहे…
 • एक देश, एक स्वप्न
  एक ओळख, आम्ही भारतीय..!
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 • आमची ओळख : आम्ही भारतीय
  प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा
 • आम्ही देशाची आन बान
  आम्ही देशाची आहोत संतान.
  तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.
  प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

 • मी हनुमान, देश माझे राम आहेत
  छाती फाडून पाहून घ्या
  आत बसलेले “हिंदुस्थान” आहे

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

 • “उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
  नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”
 • “रंग रूप वेष भाषा जरी अनेक
  भारत देशाचे निवासी
  सगळे आहेत एक
 • सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसकी वो गुलसिताँ हमारा,
  परबत वो सबसे ऊंचा हमसाया आसमां का, वह संतरी हमारा वो पासबाँ हमारा!
  गणतंत्र दिवस की बधाइयां
  !! जय हिंद !!
 • असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
  तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
  वंदन तयांसी करुनिया आज
  गाऊ भारतमाताचे गुणगान
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तनी-मनी बहरुदे नव-जोम,
  होऊदे पुलकित रोम-रोम….
  घे तिरंगा हाती,
  नभी लहरु दे उंच उंच..
  जयघोष मुखी,
  जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..
  प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
 • देशाचा अभिमान फक्त देशभक्तांकडे आहे, देशाचा सन्मान देशभक्तांकडे आहे,
  आम्ही त्या देशाचे, माझ्या देशाचे फुले आहोत, ज्याचे नाव हिंदुस्थान आहे.
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • तनी मनी बहरूदे नव जोम
  होऊ दे पुलकित रोम रोम…
  घे तिरंगा हाती,
  नभी लहरूदे उंच उंच…
  जयघोष मुखी,
  जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.
 • तीन रंग प्रतिभेचे
  नारंगी,पांढरा अन् हिरवा
  रंगले न जाणे किती रक्ताने
  तरी फडकतो नव्या उत्साहाने
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एसएमएस

 • पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
 • उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • न्याय आणि व्यवस्था हे राजकारणाचे महत्वाचे भाग आहेत. यापैकी एकही भागाला दुखापत झाली तरी औषध हे करावेच लागते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • नव्या संविधानांतर्गत काही चुकीचे होत असेल तर याचा असा अर्थ नाही की संविधान चुकीचे आहे.. यामध्ये माणसाचे काहीतरी चुकत आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा – एलेग्जेंडर हेनरी
 • कोणत्याही राष्ट्राची संस्कृती ही तेथील लोकांच्या आत्मा आणि मनात वसलेली असते

Republic Day Poem In Marathi | प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तिपर कविता

 1. असा भारत हवाय … जिथे सगळ्यांची जास भारतीय असेल
  धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल
  नातं असेल भारतीयत्वाचा…
  सुख शांती समाधान मिळेल
  शत्रूचा थरकाप उडवील.. एवढी विचारांना धार असेल
  प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल
  जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयीचा आदर असेल
 2. बलसागर भारत होवो
  विश्वात शोभुनी राहो॥
  हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
  राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥
  वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
  हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥
  हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
  ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥
  करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
  विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥
  या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
  हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥
  ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
  जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥

तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करते आणि जर तुमच्याकडे देखील काही विविध प्रकारचे मेसेजेस किंवा शायरी अवेलेबल असेल तर ते देखील तुम्ही माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून मी पुढच्या वेळेस लेख घेऊन येताना त्यामध्ये त्या शायरी आणि तुम्ही दिलेले मेसेज समाविष्ट करून घेईल जेणेकरून आपली लेख देखील खूप सुंदर बनले जातील धन्यवाद.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *