Sign In

Blog

Latest News

A प्रजासत्ताक दिन मराठी कविता |republic day marathi poem

Rate this post

Prajasattak Din Messages In Marathi, Republic Day Wishes In Marathi

प्रजासत्ताक दिन हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो . 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची राज्यघटना म्हणजेच आपल्या भारताची अंमलबजावणी झाली. संविधान हा कोणताही देश चालवण्यासाठी लागणारा पाया मानला जातो आपल्या देशाची राज्यघटना 26 जानेवारीलाच लागू झाली आणि त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन या नावाने साजरा करतो.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्वजण सकाळी लवकर उठतात आणि एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात शाळा कॉलेजचे मुलं किंवा शिक्षक सर्वजण शाळेत सकाळी लवकर जमा होतात आणि ध्वजारोहण करतात. आजकाल प्रत्येक जण फोनवर मेसेज किंवा स्टेटस टाकून एकमेकांचे अभिनंदन करतो अशा स्थितीत 26 जानेवारीला सर्वजण नव्या कवितेच्या शोधात आहेत. जेणेकरून एकमेकांना या कविता किंवा मेसेज पाठवता येतील तुम्हालाही प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना काही कविता किंवा काही मेसेज पाठवायचे असतील तर तुम्हाला आमच्या या लेखाचा नक्कीच उपयोग होईल कारण यामध्ये आम्ही खूप छान छान प्रकारच्या कविता घेऊन आलो आहोत.

 

 • भारताचा खरे विजयपर्व प्रजासत्ताक दिन आहे

स्वतंत्र  भारताची ती एक ओळख आहे

लाखो लोकांना ज्याने दिला आत्मसन्मान

तेच आहे आपले भारतीय संविधान

हवा त्याचा आपल्याला अभिमान

चला वाढवू भारत मातेची शान.

इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामीतून

देश  आपुला स्वतंत्र झाला

स्वातंत्र्य,समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता

घेऊनी हा प्रजासत्ताक दिन आला

ज्यांनी दिली या भारत देशासाठी

आपुल्या प्राणाची आहुती

व्यर्थ न जावो  त्यांची राष्ट्रभक्ती

आता कुठे भेदभाव दिसणार नाही कारण

भारताचे संविधान आता पसरले लवलाही

आला आला प्रजासत्ताक दिन आला

समता व मानवतेची तुतारी वाजवीत आला

चला चला आज प्रजासत्ताक दिन आला

वंदू त्या भारतीय संविधानाला

नि आसमंतात डौलाने फडकणाऱ्या तीरंग्याला.

 • *व्यथा प्रजासत्ताक दिनाची*

  राष्ट्रीय सणी ध्वज हा, उंच गगनी फडकला
  विद्यार्थी मात्र आमचा, कोरोनाच्या विळख्यात अडकला ||धृ||

  प्रजासत्ताक दिनाची असते, मजाच काही न्यारी
  लॉकडाऊन ने हिरावली, लगबग हि सारी ||१||

  ढोल ताशे कवायत, राष्ट्रगीत ध्वजगीत आणि संचलन
  तिरंग्याचं पण करावं लागतंय, ऑनलाईनच आकलन ||२||

  रंगीत तालीम नृत्य सजावट, राहिली सगळी भाषणे
  ओस पडली कोविडमुळे, व्यासपीठावरील आसने ||३||

  वाडी वस्ती ओसरी, वर्ग भरले मंदिरात
  शाळाच आता आतुरली, किलबिलाटऐकण्या परिसरात ||४||

  तिरंगा म्हणतोय, आहे हा आनंदोत्सव
  पण चिमुकल्यांविना, सुनाच झाला अमृतमहोत्सव ||५||

  उंच फडकून आता, मागणे मागतो देवाला
  सलामी द्यायला शाळेत, येऊ दे साऱ्या गावाला ||६||

  कोविडला करून हद्दपार, लावू मुलांना लळा
  ऑनलाईन ठेवून बाजूला, फुलवू शाळेचा मळा ||७||

  आजी-माजी सैनिक नागरिक, होतील शाळेत गोळा
  तेव्हाच साजरी होईल, राष्ट्रीय सणाचा सोहळा ||८||

  *सौ. झुंबर कदम-वाखारे*
  उपशिक्षिका
  वडगाव बांडे, ता. दौंड, जि. पुणे

 

वरील कविता जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा मी तुमच्याकडे देखील काही कवितांचे संग्रह असतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी माझ्या लेखांमध्ये त्या कविता टाकण्याचा प्रयत्न करेन आणि 26 जानेवारी बद्दल तुम्हाला ज्या कवितांबद्दल माहिती हवी होती ती मिळाली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *