Sign In

Blog

Latest News

सावित्रीबाई फुले चारोळ्या मराठी 2024 (40+ सर्वोत्तम चारोळ्या) | Savitribai Fule Charolya in Marathi | सावित्रीबाई फुले चारोळी मराठी

Rate this post

सावित्रीबाई फुले चारोळी मराठी | सावित्रीबाई फुले शायरी मराठी

नमस्कार मित्रांनो 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती असते याच निमित्ताने मी तुमच्यासाठी त्यांच्यावर आधारित काही कविता शायरी मेसेजेस घेऊन आले आहे. तर प्रथमता आपण सावित्रीबाई बद्दल काही माहिती बघूयात आणि मग आपल्या कवितांना आणि शायरीला सुरुवात करूयात.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी रोजी झाला त्यांच्या पतीचे नाव ज्योतिराव फुले होते या दोघांनी मिळून पुण्यामध्ये पहिली शिक्षण संस्था म्हणजेच एक शाळा स्थापली आणि या शाळेमध्ये पहिल्यांदी फक्त नऊ मुलींचा समावेश होता. ज्योतिबा फुलेंनी पहिल्या आणि त्यांच्या बायकोला म्हणजेच सावित्रीबाई फुलेंना वाचायला लिहायला शिकवलं आणि मग या दोघांनी मिळून समाजातील सर्व मुलींना शिक्षणाच्या वाटेवर लावलं.

आज आपल्या समाजात मुली मोकळ्या पणाने फिरताहेत किंवा शिकताहेत नोकरी करत आहेत तर हे सर्व शक्य आहे फक्त शक्य आहे ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळ.चला तर मग आपल्या आजच्या लेखाला सुरुवात करूया.

A सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्छा संदेश चारोळी | savitribai phule jayanti shubhecha sandesh charoli sms

 • या पुरोगामी व्यवस्थेच्या विरोधात

सावित्रीबाई कणखरपणे उभी राहिली

त्यामुळे सज्ञान झाली माता माऊली

सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

 • स्त्रियांच्या शिक्षणाची,
  सावित्री तूच खरी कैवारी…
  तुझ्यामुळेच शिकत आहे,
  आज प्रत्येक नारी…

  सोसूनी अनंत यातना,
  शिकवलेस तू स्त्रियांना…
  कृत्य कृत्य होतो आम्ही,
  थोरवी तुझी गाताना…

  स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला,
  उजळवलेस तू…
  क्रांतीज्योती, दिन दुबळ्यांची,
  खरी माय सावित्री तू…

  सावित्री, बघ तुझ्या लेकी,
  जगात कर्तुत्व गाजवत आहेत.
  केवळ तुझ्यामुळेच त्या,
  आज मुक्त श्वास घेत आहेत.

  तू एकटीच शिकली नाहीस,
  अनेकींना तू शिकवलेस…
  अंध:कारमय जीवन नारीचे
  शिक्षण ज्योतीने तूच उजळवलेस…

  अज्ञानाच्या बंदिस्त पिंजऱ्यात,
  कैद होती नारी…
  संकटाशी तू करून सामना,
  साऊ, मुक्त केलीस नारी…

  धैर्यशील होती सावित्री,
  शूरवीर होती सावित्री,
  ज्योतिबांचे कार्य झाले श्रेष्ठ,
  सोबतीला सावित्री…
  सोबतीला सावित्री…

  स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल,
  नव्हती मान्य कसलीच तिची भूल…
  सावित्रीबाई संघर्षाने तुझ्या,
  आला तिच्या हाती प्रगतीचा त्रिशूल…

  लेखणी जणू शस्त्र झाले,
  सन्मान आमचे परत मिळाले…
  क्रांतीज्योतीची होती प्रेरणा,
  दुःख आमचे दूर पळाले…

  सावित्रीबाई…
  झिजविले आयुष्य तू,
  अजूनही संघर्ष आमचा संपलेला नाही…
  नराधम, कुविचारांचे सावट,
  सोबतीला आमच्या राही…

  ज्ञानासाठी झिजलेली,
  शेणाने भिजलेली,
  समाजसेवेत सजलेली,
  संकटांना न खचलेली,
  ज्ञानाची आई… सावित्रीबाई…

  चला…
  चला सावित्रीची ज्योत,
  मशाल करूया,
  हातात घेऊनी हात,
  स्त्री विकासाची साथ धरूया…

  समाजाला जिने दिली
  ज्ञानाची सावली,
  धन्य ती क्रांतीज्योती
  सावित्री माऊली.

  सावित्री तू सोसलेस,
  दगड आणि धोंडे,
  रोवलेस झेंडे,
  शिक्षणाचे…

  तू क्रांतीज्योती अन
  खरी धैर्याची मूर्ती,
  तुझ्या ऋणातून
  कशी होऊ उतराई…

  उद्धारण्या भारतमातेच्या लेकी,
  दिली तू सुखाला आहूती,
  सावित्री तुझ्यामुळेच तेवत आहे,
  आज जगती ज्ञानज्योती…

  शिक्षणाच्या स्वर्गाचे,
  जिने उघडले दार,
  तीच सावित्री,
  आज जगाची शिलेदार.

  आम्ही सावित्रीच्या लेकी,
  आम्ही ज्योतिबाच्या लेकी,
  नका समजू आम्हाला दासी,
  आम्ही कर्तुत्वाच्या राशी!!

  जिच्यामुळे शिकली
  दीनदुबळ्यांची मुले,
  ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती
  सावित्रीबाई फुले!!

  होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ,
  महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार !!
  त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले
  ती ज्ञानदाती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !!

  ठोकले तू परंपरेला
  तोडले ते बंध जुने,
  आज यशाच्या शिखरावर
  बांधती ती तोरणे..

  अक्षरे ही आसू, गाळाया लागली,
  आज माय आम्हा, ओळखायला लागली.

  ज्योतीची ज्ञानज्योती तू,
  खरीखूरी तू क्रांतीज्योती
  अक्षराचा वसा देऊनी,
  प्रकाशले नारी जगती!!

  ती माया, ती शक्ती,
  कोंडूनी ठेवली होती.
  मुक्त केले पिंजऱ्यातूनी,
  श्रेष्ठ जगती सावित्री…

  हाती घेतली तुम्ही लेखणी
  नव चेतना आली जीवनी
  शिक्षणाचा दीप लावला
  ज्ञानाचा प्रकाश पडे अंगणी

  चौकटीतले होते जगणे
  आज भरारी विद्येच्या प्रांगणी
  पंख दिले सावित्रीबाईंनी
  उडण्या विशाल नभांगणी

  अनाथांसाठी हृदयी माया
  साधी, सरळ होती राहणी
  स्त्री शिक्षणाचा ध्यास होता
  स्वप्न होते एकच मनी

  तेज कार्याचे झळके तुमच्या
  इतिहासाच्या प्रत्येक पाणी
  ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई’
  हृदयी अजरामर तुमची कहाणी

  तीन जानेवारीला,
  नमन करू क्रांतीज्योतीला,
  सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला
  मान मिळाला बालिका दिनाचा !!

  महाराष्ट्राची दिव्यज्योती…
  ओवाळू त्यांची आरती !
  नमन माझे सावित्रीस…
  आज आहे त्यांची जयंती !!

  किती भोगले किती सोसले,
  तरीही तिने शिकवले !
  स्त्री शिक्षणाचे धडे पुढे,
  तिच्या साऱ्या लेकिनी गिरवले !!

  तू ग सावित्री, तू ग ज्ञानज्योती
  तू आमची विद्यादाती
  सकल महिला वर्गाची तूच आहेस ग
  भाग्यविधाती, भाग्यविधाती

  स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात
  पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती
  म्हणून तर आज जगती
  अमर आहे माता सावित्री.

  सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात
  आज आकाशात झेपावण्याचे
  बळ आहे !
  हे तू केलेल्या कार्यकर्तुत्वाचेच
  फळ आहे !!

  त्या सावित्रीने वाचविले
  पतीचे प्राण
  या सावित्रीने दिले
  महिलांना ज्ञान
  वाढविला जगती
  महिलांचा सन्मान.

  महाराष्ट्राची दिव्यज्योती
  ओवाळू त्यास आरती
  नमन माझे सावित्रीमाईस
  आज आहे त्यांची जयंती.

बालिका दिन चारोळी quotes |balika din charoli | savitribai phule jaynti quotes charoli | girls day balika din quotes wishesh message in marathi

 

 • ती आई आहे

ती मैत्रीण देखील आहे

ती मुलगी आहे

ती जीवनाची सुरुवात आहे

ती पत्नी आहे

तिच्या शिवाय सर्व व्यर्थ आहे 

सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

 

 • निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे कन्यारत्न 

परंतु त्यांनाच मिळत आहेत सध्या खूप यत्न 

आपण सर्वांनी मी मिळून करूया थोडे प्रयत्न

स्त्री उद्धारासाठी बनवूया थोडे दक्ष 

सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

 

 • मनामध्ये दुःखांना जागा असावीदुःखांना वाट करून देण्यासाठी

   एक तरी मुलगी असावी 

  सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

 • तुझ्या येण्याने जग हे झंकारलेया संस्काराने जग हे तरले

  हे सारे विश्व तुझ्या मुळे बहरले

  तूच आहे आदी आणि अंत

  सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 

 • लेक म्हणजे देवाचं देणंलेकीच्याच पावलाने सुखी होते

  आई वडिलांचे जिने 

  सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

 Savitribai Phule kavita charoli व savitribai phule quotes

लेकीप्रमाणे आम्हाला वाढवलेस, शिकवून सवरून
मोठे केलेस, ताठ मानेने जगायला शिकवलेस,
कसे फेडू तुझे उपकार तू तर दिव्यासारखे तेवत
राहायला शिकवलेस.

सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून सवरून मोठ्या
होऊ, जे नाही जमले आजपर्यंत कोणाला तो
इतिहास घडवून जाऊ.

सावित्री तू घरोघरी शिक्षणाचे दिवे लावलेस, स्वत:
मात्र ज्योतीप्रमाणे जळून आमचे आयुष्य प्रकाशित
केलेस.

अज्ञानाच्या अंधारात सर्व स्त्रीयांचे खूप हाल होते,
तू पेटवून दिवा ज्ञानाचा आयुष्य उजळवले सर्वांचे
खरच सावित्री तुझे कार्य महान होते.

तूच आमची क्रांतीज्योति तूच आमची ज्ञानाई,
सांग कसे होऊ तुझ्या ऋणातून उतराई,
तुझ्यामुळेच तर नशिबी आली पाहण्या निळी
शाई.

समाजाच्या विरोधाला नाही कधी डगमगलीस,
स्वप्न होते स्त्री शिक्षणाचे मनात जे पूर्ण करण्या
तुझी वाट तू चालत राहिलीस, धन्य ती क्रांतीज्योती
धन्य ती माऊली.

सावित्रीबाई फुले यांनी बालविवाहाला विरोध केला,
शोषित पीडित लोकांवर जीव लावला, कर्मकांडांना
धडा शिकवून स्त्रियांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा
पेटवला.

समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती
क्रांतीज्योती माऊली.

तुझे उपकार फेडणे अशक्य आहे या जन्मात,
क्रांतीज्योती तुझेच प्रतिबिंब आहे आमच्या मनात.

मुलींना शिकवा समजाला घडवा.

धुण्याभांड्यांपेक्षा शिक्षण महत्वाचे आहे, समाजाला
पुढे नेण्या मुलींना शिकवणे गरजेचे आहे.

सावित्री बाई फुले हे नाव जरी ऐकल तरी डोळ्या
समोर सावित्रीबाई फुले यांचं प्रभावी प्रतिबिंब उभ
राहत.

जिज्ञासा निर्माण होणं, याच नाव म्हणजे सावित्री
आहे.

मुली शिकतील तरच नाती टिकतील.

ती धैर्याने लढली महणून आम्ही घडलो.

तुम्ही शेळी गाय वर दया दाखवता, नागपंचमीला
नागाला दूध पाजता पण तुम्ही शोषित पीडित
लोकांना माणूस म्हणून स्वीकारायला तयार नाही.

आळशी बसू नका उठा आणि शिक्षण घ्या.

आपल्या खऱ्या शत्रूचे नाव अज्ञान आहे उठा आणि
त्याला जीवनातून दूर हाकलून लावा.

उठा शिक्षण घ्या, स्वावलंबी बना, कष्टाळू व्हा.
कष्ट करा आणि ज्ञान आणि धन एकत्र करा
विना ज्ञानाचे सर्व काही व्यर्थ जाते.

मित्रांनो वरील दिलेल्या लेखांमध्ये आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर अशा प्रकारच्या चारोळ्या बघितल्या आणि त्या देखील मराठी हिंदी भाषेतून बघितला जेणेकरून तुम्ही हिंदीमध्ये भाषण करत असाल तर हिंदी चारोळ्या वापरा आणि मराठीमध्ये करत असाल तर मराठी चारोळ्या वापरा. आज या लेखात आपण सावित्रीबाई फुले भाषण तथा सूत्रसंचालन साठी ज्या चारोळ्या लागतात त्या बघितल्या मित्रांनो आम्हाला अशा आहे की आपल्याला ह्या चारोळ्या नक्कीच आवडले असतील

आपल्या गरजू विद्यार्थ्यांना हा लेख नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला या चारोळ्यांमध्ये कुठल्या चारोळ्या आणखी टाकाव्यात असं वाटत असेल तर त्या चारोळ्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला द्या जेणेकरून आम्ही आमच्या लेखांमध्ये त्या समाविष्ट करू. आणि तुम्ही हा लेख मन लावून वाचल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *