Sign In

Blog

Latest News

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi

Rate this post

Birthday Quotes for Best Friend

नमस्कार मित्रांनो आज या लेखामध्ये आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा बघणार आहोत आणि या सर्व शुभेच्छा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील वाढदिवस साजरा करणे प्रत्येकालाच आवडते वर्षभरातून एकदा प्रत्येकाचा वाढदिवस येत असतो आणि हा दिवस खूप आनंदाचा दिवस असतो प्रत्येक वाढदिवसाला आपले वय एक वर्षाने वाढत असते आणि हाच वाढदिवस आपण आपल्या नातेवाईकांसोबत कुटुंबांसोबत साजरा करतो.

आणि आपल्या वाढदिवसाला खूप विविध प्रकारचे मेसेजेस आपल्याला येत असतात तशाच प्रकारे जर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांकडे जर कुणाचा वाढदिवस असेल तर तुम्हाला देखील मेसेजेस ची गरज भासते आणि आपण सर्वजण असा विचार करतो की त्यांना आपण काहीतरी असा वेगळा मेसेज पाठवावा जेणेकरून त्यांना आपला मेसेज बघून त्यांचा दिवस आनंदात जाईल आपण खूप साऱ्या कवितांच्या किंवा मेसेजेसच्या त्याच प्रकारे शायरीच्या शोधात असतो तर या सर्व गरजा तुम्हाला जाणवत असतील तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे कारण या मध्ये मी शायरी मेसेजेस तसेच कविता ंचा लेख घेऊन आले आहे.

हा लेख तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींना आई-वडिलांना नातेवाईकांना किंवा सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे चला तर मग आपल्या आजच्या मेसेजेस च्या लेखाला सुरुवात करूया.

तुमच्या ओळखीत वाढदिवस आहे? चिंता करू नका, ‘या’ शुभेच्छांचा होईल उपयोग

“उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,
वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा”

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
🎂🙏वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🙏

उगवता सुर्य 🌞 तुम्हाला
खूप आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुझ्या आयुष्यात
सुगंध भरो🌷,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
🎂🙏वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🙏

वाढदिवसचा हा दिवस पुन्हा पुन्हा येवो,
प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देवो,
आणि आमच्या ❤️ हृदयातुन प्रार्थना करतो
तुम्ही हजारो वर्षे जगो.
🎂💐भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💐

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि
प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात ❣️ असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा 🥰 आहे.
🎂🥰तुम्हाला वाढदिवसाच्याहार्दीक शुभेच्छा दोस्त.🎂🥰

ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू 👸 दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️

वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी/ Happy Birthday wishes in marathi 2024.

माझी पहिली गुरु, अखंड ❤️ प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
🎂🌹माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🌹

आई, तू जगातील एकमेव
न्यायालय आहेस
जिथे माझी प्रत्येक
चूक माफ केली 😇😘 जाते.
तुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला
दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा 💐 देतो.
🎂🥳Happy Birthday Aai.🎂🥳

नाती जपली प्रेम 💝 दिले या
परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी
हीच एक सदिच्छा.
🎂🌹जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा वहिनी.🎂🌹

वहिनी तुमच्यासारखीच असो,
जी सर्वांसाठी आनंद घेऊन येते!
तुम्ही आमच्या घरी आलात हे आमचे भाग्य!
हा आनंद तुमचे जीवन समृद्ध 💫 करो,
तुमच्या वाढदिवशी आम्ही
तुमच्यासाठी ही प्रार्थना घेऊन आलो आहोत!
🎂🍫आमच्या लाडक्या वहिनीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫

Happy Birthday wishes in Marathi

माझ्या जीवनात मार्गदर्शन केल्याबद्दल
आणि
त्याला उद्देश दिल्याबद्दल धन्यवाद.
💐 गुरुवर्य वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ

अधिक अधिक विस्तारीत होत जावो !

तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,

तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.

आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि

ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday.

 

जे जे हवे तुला ते ते मिळू दे,

भाग्यवान या शब्दाचा अर्थ

तुज्याकडे पाहुन कळु दे,

शिखरे यशाची सर तु करावी,

पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,

तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,

आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Wish you Happy Birthday.

 

उजळून निघावा यश कीर्ती ने चेहरा तुमचा

अन् त्यावर समाधानाची लाली चढावी,

परोपकारी वृत्ती मनी दाटून,

हातून जगत कल्याणाची कार्ये घडावी.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं,

अन् सुख शांतीने सजवावं,

अडचणींचे डोंगर पार करून,

यश शिखरावर तुम्ही पोहचावं.

आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात

भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,

देवाकडे प्रार्थना आहे की,

आयुष्यात तुला वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Heart Touching Birthday Wishes In Marathi For Mother

आई म्हणजे आनंदाचा झरा, आई तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेस, तुझ्या या खास दिवशी तुला माझ्या मनातील प्रेम कदाचित मला दाखवता येणार नाही पण वागण्यातून तुझ्याविषयीचे प्रेम नक्की व्यक्त होईल, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!

तुला नेहमी चांगले आरोग्य लाभो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करेनच इतकंच वचन आजच्या दिवशी तुला देऊन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे आई!

निःस्वार्थ प्रेम करणाऱ्या माझ्या आईला वाढदिवसाच्या भरभरून आणि आभाळभर शुभेच्छा!

आमच्या आवडीनिवडी स्वतःच्या मानणारी आणि आमच्याच सुखात कायम सुख मानणारी अशी व्यक्ती म्हणजे आई तू आहेस, आजच्या तुझ्या या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा!

कितीही रागावले तरीही जवळ घेतेस तू मला, रूसवा घालविण्याची कलाच अवगत आहे तुला, कायम केल्या पूर्ण माझ्या इच्छा, आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझ्यावर ठेवणाऱ्या माझ्या आईला शतशः नमन आणि वाढदिवस शुभेच्छा!

तू शतायुषी, दीर्षायुषी व्हावीस आणि तुझ्या आयुष्यात कायम सुखच पाझरावे हीच सदिच्छा, आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अबोल तू अस्वस्थ मी अक्षर तू शब्द मी 💓 समोर तू आनंदी मी श्वास तू देह मी 😍 सोबत होतो संपूर्ण मी माझी आई तू तुझा लाडका बाळ मी 🎂 माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍥🎉🔥

प्रत्येक क्षणालापडावी तुझी भुलखुलावेस तू सदाबनुन हसरेसे फ़ुलवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जर हा Happy Birthday wishes in Marathi लेख तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि यातील काही शायरी मेसेजेस किंवा कविता तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना पाठवण्यासाठी उपयुक्त ठरले असतील तर ते देखील मला कमेंट मध्ये सांगा आणि जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त काही मेसेजेस किंवा काही कविता असतील तर त्या देखील मला कमेंट मध्ये नक्की पाठवा जेणेकरून मी पुढचा लेख त्यावर लिहील

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *