Sign In

Blog

Latest News

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024 | Republic Day Wishes And Quotes In Marathi

Rate this post

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Republic Day Marathi Wishes

26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. ज्याची अनेक कारणे होते देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली त्याचवेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणाली सह संविधान लागू करण्यात आले या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले .

1929 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये सर्व संमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने 26 जानेवारी 1930 पर्यंत भारताला डोमीनियान दर्जा द्यावा. आणि याच दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला होता.

26 जानेवारी 1950 रोजी सकाळी दहा वाजून 18 मिनिटांनी आपला हा भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र बनला त्यानंतर बरोबर सहा मिनिटांनी दहा वाजून 24 मिनिटांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिल्यांदाच राष्ट्रपती म्हणून एक राष्ट्रपती भवनातून बाहेर पडले होते जिथे त्यांनी प्रथमच लष्करी सलामी घेतली. या दिवशी तिरंगा फडकवण्याबरोबरच राष्ट्रगीत गाणे आपण भारतीय एकतर अनेक कार्यक्रम आयोजित करतो किंवा त्याचा भाग बनतो विशेषता हे कार्यक्रम एखाद्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होतात आत्ताच्या काळामध्ये काही काही सोसायटी देखील हे कार्यक्रम आयोजित करते.

26 जानेवारी रोजी परत देखील काढली जाते आणि या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जाते. आणि यात सर्व गोष्टी नंतर प्रजासत्ताकाचा कार्यक्रम संपला जातो.

आता याच प्रजासत्ताक दिनाबद्दल आपण काही मेसेजेस आणि क्युट्स बघणार आहोत जे की तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना शिक्षकांना आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करू शकता आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.

 • वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
  वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे.
  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • “कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते”
  माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

 • माझा भारत महान,
  भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
  भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
 • भारतीय असण्याचा करूया गर्व,
  सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
  देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
  घराघरावर तिरंगा लहरवू
  Happy republic day 2024

 • रक्ताची खेळू होळी,
  देश धोक्यात असेल तर
  नाही घाबरणार आम्ही,
  बलिदान देऊन होऊ अमर
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • लढले होते मातीसाठी
  जसे तिच्याचसाठी घडले होते.
  वीरपुरूष ते मातेसाठी
  मृत्यूलाही भिडले होते!
  प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

Republic Day Quotes in Marathi

 • “झेंडा आमुचा प्रिया देशाचा
  फडकत वरी महान
  करितो आम्ही प्रणाम याला
  करितो आम्ही प्रणाम
  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”
 • मोकळ्या आकाशात रंग भरू तीन
  जगभर पसरवू रंग त्याग नी शौर्याचा
  जगभर पसरवू रंग शांततेचा
  जगभर पसरवू रंग समृद्धीचा,
  करू नमन आपल्या तिरंग्याला,
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • घे तिरंगा हाती
  नभी लहरू दे उंच उंच
  जयघोष मुखी
  जय भारत जय हिंद
  गर्जु दे आसमंत
  प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 • Freedom in the mind,, Faith in the words,, Pride in our hearts,, And Memories in our souls,, Lets salute,, The Nation on Republic Day.
 • लहराएगा तिरंगा अब सारे आस्मां पर,
  भारत का नाम होगा सब की जुबान पर,
  ले लेंगे उसकी जान या दे देंगे अपनी जान,
  कोई जो उठाएगा आँख हमारे हिंदुस्तान पर।
 • तिरंगा आता आकाशाला भिडेल
  भारताचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर असेल
  त्याचा जीव घेईल किंवा आपला जीव देईल
  जो कोणी आपल्या भारतावर डोळा ठेवेल
 • तिरंगी आमचा भारतीय झेंडा त्याला उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, भारतमातेला वंदन करूया, देशाला जगातील सर्व, संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी, कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

HAPPY REPUBLIC DAY 2023 WISHES MARATHI

 • देश विविध रंगाचा,
  देश विविध ढंगाचा,
  देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 • अतिशय समृद्ध इतिहास आणि वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो या गोष्टीचा अभिमान बाळगा.
  प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

Republic Day Poem In Marathi | प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तिपर कविता

 • स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कृष्ण हनुमान
  व्यासादिक मुनिवरे गाइला
  संत महंते पावन केला
  प्रताप शिवबाने गाजविला
  सुखसमृध्दिनिधान
  चिंतनि इतिहासाच्या दिसती
  असंख्य नरवीरांच्या ज्योती
  गाता स्वतंत्रतेची किर्ती
  घडवू नव संतान
  धर्मासाठी जीवन जगणे
  समष्टिमध्ये विलीन होणे
  सीमोल्लंघन दुसरे कसले
  यासाठी बलिदान
 • या आपण नतमस्तक होऊ ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे
  नशीबवान आहे हे रक्त जे देशाच्या कामी आलं आहे

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला या लेखाचा किंवा यात मी जे 26 जानेवारी बद्दल कविता मेसेजेस लिहिलेले आहेत त्याचा कुठे उपयोग झाला आहे देखील मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जरी काही मेसेजेस किंवा कविता असतील तर त्या देखील मला कमेंट मध्ये सांगा जेणेकरून मी देखील त्यावर एक नवीन लेख घेऊन येईल आणि तुमच्या सोबत तो लेख शेअर करेन धन्यवाद.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *